बेळगाव / प्रतिनिधी
मुळचे आनंदवाडी व सध्या आदर्शनगर वडगाव येथील रहिवासी, वेदांत को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब निंगाप्पा भेकणे (वय ५१) यांचे आज सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुलगे, एक भाऊ, एक बहीण, वहिनी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी साडेतीन वाजता शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत होणार आहेत.बाबासाहेब भेकणे यांच्या आकस्मिक निधनाने शहापूर वडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments