बेंगळूर : हसन तालुक्यातील किटणे नजीक आयपीएस अधिकाऱ्याचा आज अपघाती मृत्यू झाला. मध्यप्रदेश स्थित २०२३ चे प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन, हे हसन पोलीस अधीक्षक कार्यालयात येत असताना, हसन तालुक्यातील किटणेनजीक पोलीस जीपचा टायर फुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात जीपमधील प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन आणि चालक गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु उपचाराचा काही उपयोग न होता, त्यांचा मृत्यू झाला आहे.
0 Comments