- हल्ल्यात वृद्ध शेतकरी गंभीर
खानापूर / प्रतिनिधी
माण (ता.खानापूर जि.बेळगाव) येथे दोन अस्वलांनी शेतात काम करणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी सखाराम महादेव गावकर (वय ६३) व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून सखाराम यांच्या पायांना दुखापत झाली आहे.
अस्वलांनी अचानक केलेल्या हल्ल्यातून प्रसंगावधान राखून शेतकऱ्याच्या पत्नीने स्वतःचा जीव वाचवला. मात्र शेतकरी अस्वलांच्या तावडीत सापडला. तेव्हा त्या वृद्धेने पतीचे हाल पाहिले. या हल्ल्यात सखाराम गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वलोक फाउंडेशनचे वीरेश हिरेमठ यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली.अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धावर आता रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत असून रक्तस्त्राव थांबला आहे. तेव्हा या रुग्णावर शस्त्रक्रिया करावी, असे सांगितले.
0 Comments