- शाळा - महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
- दि. १० ते १२ डिसेंबर दरम्यान तीन दिवसांचा दुखवटा
बेंगळूर : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करून उद्या शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दि. १० डिसेंबर ते १२ डिसेंबर असा शोककालावधी जाहीर करण्यात आला असून दिवंगत ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन दिवस सर्व राज्य सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.
तीन दिवस कोणतेही शासकीय कार्यक्रम किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, कृष्णा यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी मद्दूर येथे बुधवारी दुपारी ४ वाजता अंतिम संस्कार केले जातील. बेंगळूर मध्ये उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत आणि मद्दूरमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत जनतेला अंतिम श्रद्धांजली वाहण्याची परवानगीही सरकारने दिली आहे.
0 Comments