बेळगाव / प्रतिनिधी
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ ३ डिसेंबर रोजी. एपीजे अब्दुल कलाम सभागृहात होणार असल्याची माहिती राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रा. सीएम त्यागराज यांनी दिली.
बेळगावातील संगोळी रायण्णा महाविद्यालयात सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यपाल थावरचंद गेहलोत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. दीक्षांत समारंभाचे भाषण यू एन फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन मंगळूरचे माजी वरिष्ठ अधिकारी, डॉ. इद्या करुणासागर करणार आहेत. उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणे असल्याची माहिती त्यांनी दिली.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तीन व्यक्तींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील पद्मश्री पंडित एस. बाळेश भजंत्री, उद्योजकता आणि समाजसेवा क्षेत्रातील गोपाळ जिनगौडा, नागरी क्रीडा परोपकारी सेवा क्षेत्रातील गोपाल होसुर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विभागांतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments