बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविषयी सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहित नरसिंहमुर्ती (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  

याप्रकरणी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय विजय तळवाळ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मार्केट पोलिसांनी तपास करत आरोपीला तुमकूर येथे शोधून काढत अटक केली आणि बेळगाव येथे आणून न्यायालयात हजर केले.   

पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सोशल मीडियावरील बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.