- महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा
- मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीच्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी सोहळा
- मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री आणि अन्य काही मंत्री घेणार शपथ
मुंबई : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा तिढा आज अखेर सुटल्याचे चित्र आहे. महायुतीतील भाजपकडून आज मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर करण्यात आले आहे. आज पार पडलेल्या विधीमंडळाच्या गटनेता पदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या गुरूवारी (५ डिसेंबर) रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
0 Comments