• प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी साकारली रांगोळी 

बेळगाव : येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रांगोळी रेखाटून श्रद्धांजली अर्पण केली.


दीड फूट बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओ मध्ये ही रांगोळी काढण्यात आली असून ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना पाच तास वेळ लागला आहे. दि. ३० डिसेंबर पर्यंत ही रांगोळी ज्योती स्टुडिओ येथे सकाळी १०  ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.