• खास दिपावली निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सुळगा यांच्यावतीने केले आयोजन 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा यांच्या वतीने खास दिपावली निमित्ताने श्री शिवकालीन किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्री ब्रम्हलिंग मंदिरमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष, श्री सागर भरमा सांगावकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

प्रारंभी श्री. प्रवीण पाटील आणि श्री.पप्पू भरमा पाटील यांच्या शुभहस्ते श्री गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, श्री सागर भरमा सांगावकर आणि श्री मिथुन मोनाप्पा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.  


तसेच  दीपप्रज्वलन  श्री. मदन मोनाप्पा पाटील आणि श्री. विक्रम जोतिबा जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी श्री. अजित मल्लप्पा कलखांबकर यांनी बहुमोल असे आपले विचार मांडले.

या स्पर्धेमध्ये श्री. ब्रह्मलिंग तालीम मंडळाने प्रथम  क्रमांक  रु. ३०००/-, श्री शिवशक्ती युवक मंडळाने द्वितीय क्रमांक रु. २०००/-, श्री बालवीर युवक मंडळाने तृतीय क्रमांक रु. १०००/- , श्री. बनवेश्वर युवक मंडळ चतुर्थ क्रमांक रु.५००/- आणि व्हीआर तालीम मंडळाने उत्तेजनार्थ रु.५००/- रुपयांचे पारितोषिक पटकावले.

प्रथम क्रमांकासाठी श्री. नारायण लक्षण कदम (माजी ता. पं. सदस्य) आणि द्वितीय क्रमांकासाठी श्री. सागर भरमा सांगावकर (शाळा सुधारणा कमिटीचे, अध्यक्ष) यांच्याकडून तसेच तृतीय क्रमांकासाठी श्री. मिथुन मोनाप्पा पाटील (सामाजिक युवा कार्यकर्ते,धारकरी) आणि श्री. विक्रम जोतिबा जाधव (उपविभाग प्रमुख शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा) यांच्याकडून पारितोषिक देण्यात आले. तर चतुर्थ  क्रमांकासाठी श्री. महादेव दु. कंग्राळकर (ग्रा. पं. सदस्य) आणि उत्तेजनार्थसाठी श्री.सागर सुरेश डोनकरी (सामाजिक युवा कार्यकर्ते) यांचेकडून पारितोषिक देण्यात आले. 

या समारंभासाठी गावातील सर्व किल्लेदार, बाळगोपाळ, युवावर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. शेखर मनोहर पाटील यांनी केले.