• माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे नियोजित कार्यक्रम लांबणीवर 

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक सरकारने माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांच्या निधनामुळे  राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे अधिवेशन काळात सुवर्णसौध येथे दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. 

त्यामुळे दि. ११ डिसेंबर रोजी नियोजित  मराठा आरक्षण आंदोलन ही तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. तरी मराठा समाजातील सर्व संघटनांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मराठा संघटन बेळगाव कर्नाटक क्षत्रिय मराठा संघटनचे संयोजक श्री. विनय विलास कदम यांनी केले आहे.