• गळफास घेऊन संपविले जीवन 
  • आत्महत्येस कारणीभूत आरोपी पोलिसांच्या ताब्यात   

रायबाग / वार्ताहर 

कर्जाच्या त्रासाला कंटाळून एका मजुराने सेल्फी व्हिडिओ बनवून गळफास घेऊन आत्महत्या केली. बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील डिग्गेवाडी गावात ही घटना घडली. अप्पासाब कंबार असे मृताचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मृत अप्पासाब कंबार याने रेखा व भीमूला यांच्याकडून अंदाजे ५० हजाराचे कर्ज घेतले होते. त्याच्या बदल्यात संबंधितांना त्याने लाखो रुपये व्याज दिले. मात्र अजून व्याज देण्यासाठी रेखा व भीमूत्रास देत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

मृत अप्पासाब एका खासगी क्रशरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मृत अप्पासाब यांनी माझ्या मृत्यूमुळे इतर कोणालाही त्रास देऊ नये, अशी विनंती केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संबंधीतांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.