- शहर - जिल्हा भाजप व्यापार व वाणिज्य सेलच्यावतीने शहर पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
गांजा व अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर बंदी घालण्यासाठी बेळगाव शहर आणि जिल्हा भाजप व्यापार व वाणिज्य सेलच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन व सहाय्यक पोलीस आयुक्त रोहन जगदीश यांना बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारून पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी तातडीने संबंधित पोलिस विभागाला अवैध विक्री स्टॉलची चौकशी करण्याचे आदेश दिले. जनतेने अशा घटनांची तात्काळ पोलीस विभागाकडे तक्रार करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी भाजप महानगर सरचिटणीस इरय्या खोत,महादेवी हिरामर समन्वयक जिल्हा समिती, ज्योती शेट्टी, सदस्य राज्य व्यापार व वाणिज्य समिती, चेतन कट्टी नियंत्रक व्यापार व वाणिज्य समिती बेळगाव, नागराज पाटील समन्वयक जिल्हा समिती, महादेव दरेन्नावर अध्यक्ष युवा मोर्चा, विनोद लंगोटी सचिव उत्तर मंडळ, विजय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments