- पुढील उपचारासाठी हुबळीला हलवले
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील प्रसूती व बालरोग विभागात दाखल झालेल्या आणखी एका गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली आणि बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. तर त्या गर्भवती महिलेचा जीवन - मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. बीम्समध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने तिला हुबळीच्या किम्स रुग्णलयात हलवण्यात आले आहे. शासनाने स्थानिक पातळीवर योग्य उपचार करून रुग्णांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी त्या महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
गोकाक तालुक्यातील मेलमट्टी गावातील राधिका मल्लेश गड्डीहोळी (वय १९) या गर्भवती महिलेला आज पहाटे ४ वाजता प्रसूतीसाठी बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी गर्भवती महिलेला पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे.
तत्पूर्वी गर्भवती राधिकाची प्रकृती खालावल्याने तिला यमकनमर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण प्रकृती खालावल्याने राधिकाला केएलई रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले.मात्र, तेवढा खर्च परवडत नसल्याने तिला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनीही तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. दरम्यान राधिकाच्या नातेवाईकांनी यमकनमर्डीसह सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये चांगले उपचार मिळावेत यासाठी सरकारकडे आर्जव केला.
गर्भवती महिलेला फिट्स येत असून ती सध्या बेशुद्ध आहे. सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेऊन उपचार सुरू आहेत. बीआयएमएसमध्ये हृदयरोगतज्ज्ञ आणि न्यूरोसर्जनची कमतरता आहे. सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. आम्ही पात्र हृदयरोग तज्ज्ञांद्वारे उपचारासाठी किमच्या रुग्णालयात पाठवत आहोत. मोफत उपचार करून गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी आम्ही आमच्या शक्तीपलीकडे प्रयत्न करत आहोत. रुग्ण शेवटच्या टप्प्यात दाखल असताना बीम्सवर आरोप - प्रत्यारोप होत आहेत. वेळीच प्रवेश घेतल्यास योग्य उपचार दिले जाऊ शकतात. बीम्समध्ये दर महिन्याला ७०० ते ८०० डिलिव्हरी होतात त्यामुळे डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे रूग्णालयाच्या सुविधांमध्ये वाढ केल्यामुळे पूर्वीपेक्षा बाळंतिणींच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे म्हणाले.
0 Comments