• नववर्षाच्या सुरक्षेसाठी १००० हून अधिक पोलिस तैनात
  • प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक अमरनाथ रेड्डी 

बेळगाव / प्रतिनिधी 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटकांवर पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. कायदा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात आणि शांततेत व्हावे यासाठी पोलिस विभागाने कडक उपाययोजना केल्या आहेत. १००० हून अधिक पोलिसांची विशेष नेमणूक करून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. दारू पिऊन वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे किंवा कायदा भंग करणाऱ्यांवर कोणतीही माफी न ठेवता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी दिला आहे.

पोलिसांनी विशेषतः रस्त्यावर त्रासदायक वर्तन करणाऱ्या आणि उपद्रवी व्यक्तींवर लक्ष ठेवले असून, कोणताही शिस्तभंग झाल्यास संबंधित व्यक्तींना तातडीने कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. याबरोबरच, सर्वसामान्य नागरिकांनी नवीन वर्ष शांततेत साजरे करावे, अशी विनंती देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे.