- रोटरी क्लब ऑफ बेळगाव वेणुग्रामच्यावतीने आयोजन
- रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात दि. २८ आणि २९ डिसेंबर रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, असे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला जुन्या इतिहासाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने दि. २८ व २९ डिसेंबर रोजी महावीर भवन येथे जुन्या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून क्लब सामाजिक कार्यात सक्रिय आहे. त्यांनी शासकीय शाळेत मुलभूत सुविधा पुरविण्यातही मदत केली आहे. त्याचबरोबर, २६ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातून जमवलेल्या पैशाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केला जाईल. जुन्या नाण्यांच्या प्रदर्शनासाठी शाळा व महाविद्यालयांना मोफत पास वितरित करण्यात आले आहेत, जेणेकरून विद्यार्थी व नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. विद्यार्थ्यांनी व जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
0 Comments