बेळगाव / प्रतिनिधी 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीने प्रचंड दु:ख झाले आहे. मनमोहन सिंग यांनी आपल्या शांत स्वभावाने, प्रगल्भ ज्ञानाने आणि अतुलनीय दूरदृष्टीने देशाची अर्थव्यवस्था आणि शासनव्यवस्था नव्या उंचीवर नेली.

मनमोहन सिंग यांनी आर्थिक तज्ज्ञ म्हणून केलेल्या जागतिक क्षेत्रात भारताचा नावलौकिक वाढला. सर्वोत्कृष्ट अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ अशी ओळख असलेले मनमोहन सिंग यांना जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट पुरस्कारही मिळाले. ते सलग १० वर्षे भारताचे पंतप्रधान होते आणि हे पद भूषवणारे ते शीख समुदायातील पहिले व्यक्ती होते.मनमोहन सिंग यांचे कर्तृत्व सदैव प्रत्येकाच्या मनात राहिल.

त्यांचे आचरण लोकशाहीचे महत्त्व पटवून देणारे होते. अलौकिक बुद्धिमत्ता म्हणून त्यांनी नेहमीच जनसामान्यांचा जिव्हाळा जपला. या दुःखाच्या क्षणी मी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांचे कर्तृत्व आणि मूल्ये सदैव प्रत्येकाच्या मनात जिवंत राहतील.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आधार अंमलबजावणी, रोजगार हमी, माहितीचा अधिकार कायदा, अमेरिकेसोबत नागरी अणुकरार यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या काळात राबवण्यात आल्याची आठवण मंत्र्यांनी सांगितली.