• सीपीएड् मैदानावरील पेंडलसह शहरातील बॅनर - झेंडे हटविण्याचे काम सुरू

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव येथे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी कार्यक्रम दि. २७ डिसेंबर रोजी होणार होता. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या चौकातून आणि रस्त्यांवरील काँग्रेस पक्षाचे मोठे बॅनर आणि झेंडे काढण्याचे काम सुरु असून सीपीईडी मैदानावर लावण्यात आलेले मोठे पेंडल मोकळे करण्यात येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरात लखलखणारे दिवे बंद करण्यात आले असून, काँग्रेस नेत्यांच्या स्वागतासाठी आणि गांधी भारत कार्यक्रमासाठी शहरात लावण्यात आलेले फलक, बॅनर काढण्यात येत आहेत.