पुणे दि. २ डिसेंबर (प्रतिनिधी) : जयपूर राजस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या थोडा स्पोर्ट्स राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये (Thoda Sports National Championship) मध्ये कुमार पार्थ परशराम निलजकर आणि कुमारी गीतांजली उमेश निलजकर या दोघांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन केले आहे.


पार्थ याने कुलशो (fight) आणि मॉडेन थोडा या दोन्ही विभागांमध्ये सुवर्णपदक (Gold Medal) प्राप्त केले आहे. तर गीतांजली उमेश निलजकर हिने कुलशो (fight) मध्ये सुवर्णपदक (Gold Medal) आणि मॉडेन थोडा मध्ये रौप्यपदक (Silver Medal) प्राप्त केले आहे.  

पार्थ हा खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचे संचालक तसेच हर्ष इंडस्ट्रीज पुणेचे मालक श्री. परशराम कृष्णा निलजकर (मूळगाव गोदगेरी ता. खानापूर) यांचा मुलगा तर गीतांजली ही गीता एंटरप्रायजेस पुणेचे मालक श्री. उमेश कृष्णा निलजकर (मूळगाव गोदगेरी, ता. खानापूर) यांची ती मुलगी होय.

कुमार पार्थ आणि कुमारी गीतांजली हे पुणे येथे अनुक्रमे इयत्ता सहावी व इयत्ता आठवीमध्ये शिकत असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  ‎