• पतीची पोलिसात फिर्याद ; पत्नीला अटक 

कागवाड / वार्ताहर 

महिलेने पोटच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील फरीदखानवाडी मळ्यात घडली. सात्विक राहुल कटगेरी असे मृत मुलाचे नाव आहे. शनिवारी सकाळी मृत राहुलची आई भाग्यश्री हिने त्याची हत्या केली. यानंतर स्वतःला चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

काही वर्षांपूर्वी राहुल मारुती कटगेरी यांचा भाग्यश्रीसोबत विवाह झाला असून दोघे फरीदखानवाडी येथील फार्म हाऊसमध्ये राहत होते. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

बेळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. एस. बसरगी, चिक्कोडीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर, उपनिरीक्षक जी.जी. बिरादर, सीडीपीओ संजीवकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.याप्रकरणी मृत मुलाचे वडील राहुल कटगेरी यांनी कागवाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असता, आई भाग्यश्री कटगेरी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी करण्यात येत आहे.