चिक्कोडी / वार्ताहर
इंगळी (ता. चिक्कोडी) येथे शुक्रवारी रात्री दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्रभाकर घोसरवडे (वय ४५), मोहन कोळी (वय ४२) आणि नागेंद्र शिरहट्टी (वय ३५) तिघेही रा. इंगळी (ता. चिक्कोडी ; जि. बेळगाव) हे दुचाकीवरून इंगळी येथून शिरगुप्पी गावाकडे जात असताना हा अपघात झाला.
या अपघातात प्रभाकर घोसरवडे व मोहन कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. मात्र नागेंद्र शिरहट्टी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अंकली पोलिसांनी दिली.
अपघातानंतर अंकली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला. याप्रकरणाची नोंद अंकली पोलिस स्थानकात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments