- अपघातात क्लीनर गंभीर जखमी
बेळगाव / प्रतिनिधी
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात क्लीनर गंभीर जखमी झाला. बेळगाव तालुक्याच्या हलगा राष्ट्रीय महामार्गाजवळ हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, बेळगाव तालुक्यातील हलगा राष्ट्रीय महामार्गावर धारवाडहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने रस्त्यानजीक उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. अपघातामुळे मालवाहक वाहनाच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर वाहनाखाली अडकलेल्या क्लिनरची सुटका करून त्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात क्लिनर रविकुमारचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments