बेळगाव / प्रतिनिधी
खबऱ्याने यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हिरेबागेवाडी पोलिसांनी गांजा विक्रीमध्ये गुंतलेल्या एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडील ६०,०००/- रुपये किमतीचा ४.३ किलो गांजा जप्त केला आहे. हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या शुक्रवारी सदर कारवाई केली. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईबद्दल हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षकांचे कौतुक करण्यात आले आहे.
0 Comments