बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावमध्ये ऑटो रिक्षांमध्ये मीटर बसवणे अनिवार्य असून पूर्व तयारी करून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.

बेळगाव शहरात चालणाऱ्या ऑटो रिक्षांना मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण मिळवून ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी, या चांगल्या हेतूने जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. मीटर बसवण्यासाठी ऑटो चालकांना दिलेला वेळ याशिवाय मीटर खरेदी आणि देखभालीची व्यवस्था केल्यानंतर ऑटो मीटर अनिवार्य करण्यात येणार असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे ऑटोचालकांनीही स्वागत केले आहे. मात्र त्याआधी ऑटोचालकांसाठी किमान भाडे निश्चित करण्यात यावे.  दरात सुधारणा करावी. ऑटोचालकांची बैठक घेऊन मीटर अनिवार्य करावेत, अशी त्यांची मागणी आहे. एकंदरीत येत्या ५ ते ६ महिन्यात बेळगावात ऑटो मीटर अनिवार्य होण्याची चिन्हे आहेत.