बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावची स्केटिंगपटू खुशी एकनाथ अगसिमनी हिने बेंगळुरू येथे आयोजित स्केटिंगमध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावत उत्तम कामगिरी केली आहे. २ नोव्हेंबर २०२४ रोजी बेंगळुरू येथे झालेल्या 40 व्या कर्नाटक निवड चाचण्यांमध्ये फ्रीस्टाईल आणि सोलो आर्टिस्टिक स्केटिंगमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकून बेळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले. 

या स्पर्धांचे आयोजन कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन (के.आर.एस.ए.) यांच्यातर्फे करण्यात आले होते. खुशीच्या या यशात तिचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि विठ्ठल गगणे यांचा अनमोल वाटा आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे खुशीने उत्तम कौशल्य दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली असून तिच्या या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.