- पहिल्याच दिवशी तब्बल १७ विकेट्स ; ऑस्ट्रेलिया ८३ धावांनी पिछाडीवर
पर्थ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस हा गोलंदाजांच्या नावावर राहिला आहे. पर्थमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी तब्बल १७ विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्या डावात १५० धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पलटवार करत कांगारुंना दणका दिला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ७ धक्के दिले. ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत २७ ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून ६७ धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे अजून ८३ धावांची आघाडी आहे. आता दुसर्या दिवशी गोलंदाज ऑस्ट्रेलियाला झटपट ३ झटके देत टीम इंडियाला आघाडी मिळवून देतात का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
- ऑस्ट्रेलियाची पडझड :
टीम इंडियाच्या १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला कॅप्टन जसप्रीत बुमराह याने सुरुंग लावला. बुमराहने नॅथन मॅकस्वीनी याला १० धावांवर बाद केले. त्यानंतर बुमराहने कांगारुंना सलग २ धक्के दिले. उस्मान ख्वाजा याने ८ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथला भोपलाही फोडता आला नाही. स्मिथ गोल्डन डक झाला. त्यानंतर डेब्यूटंट हर्षित राणा याने ट्रेव्हिस हेडचा ऑफ स्टंप उडवत क्लिन बोल्ड केले.
मोहम्मद सिराज याने मिचेल मार्श याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखला. केएलने मिचेलचा कॅच घेतला. मिचेलने ६ धावा केल्या. सिराज मार्नस लबुनेशला २ धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. तर त्यानंतर कॅप्टनने कॅप्टनला आऊट केले. बुमराहने पॅट कमिन्सला 3 धावांवर विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केले. तर मिचेल स्टार्क ६ आणि एलेक्स कॅरी १९ धावांवर नाबाद परतले आहेत. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजने २ विकेट्स मिळवल्या. तर हर्षित राणा याने १ विकेट मिळवली.
- टीम इंडियाची बॅटिंग :
त्याआधी कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेके जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी पदार्पण केले. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्वीनी याने डेब्यू केले. नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वाल याच्यासह केएल राहुल ओपनिंगला आला. ही सलामी जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली.
यशस्वी जयस्वाल आणि तिसऱ्या स्थानी आलेला देवदत्त पडीक्कल हे दोघे झिरोवर आऊट झाले. विराट कोहली हा देखील अपयशी ठरला. विराट ५ धावा करुन माघारी परतला. केएल राहुल तळ ठोकून उभा होता. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे केएल राहुलला मैदानाबाहेर जावे लागले. केएलने २६ धावा केल्या. ध्रुव जुरेल याने ११ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर याने ४ धावा केल्या. ऋषभ पंतने ३७ धावांची खेळी केली.
हर्षित राणा याने ७ तर जसप्रीत बुमराह याने ८ धावा केल्या. तर डब्यूटंट नितीश कुमार रेड्डी याने पहिल्याच डावात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले. नितीशने ४१ धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला १५० धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श या तिघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या.
0 Comments