बेळगाव / प्रतिनिधी 

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात रविवारी दि. २४ रोजी देवस्थान कमिटीच्या वतीने ११ हजार दिवे लावून दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे पुढील प्रमाणे संकल्पना करण्यात आली आहे.

सकाळी ७.०० वाजता अभिषेक व विशेष पूजा सायंकाळी ५.३० वाजता दीपोत्सवाला प्रारंभ सायंकाळी ८.०० वाजता महाआरती ८.३० नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या दीपोत्सव कार्यक्रमास भक्तमंडळीने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री ज्योतिबा मंदिर शिवबसवनगरचे अध्यक्ष अमर येळ्ळूरकर यांनी केली आहे.