अथणी / वार्ताहर
अथणी येथील एका फार्म हाऊसमध्ये दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. नानासाहेब बाबू चौहान (वय ५८) आणि जयश्री नानासाहेब चौहान (वय ५०) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. अथणी शहाराच्या हद्दीतील मदभावी रोडनजीक चौहान मळ्यातील फार्म हाऊसमध्ये कुजलेल्या अवस्थेत या दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला. पती-पत्नी दोघांचाही पाच-सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय आहे. तो खून आहे की आत्महत्या हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
0 Comments