सुळगा (हिं.) : येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघ पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्र आणि सांस्कृतिक मंच वेंगुर्ला रोड सुळगा यांच्या संयुक्त विद्यमाने खास दीपावलीनिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धांचा क्रीडा महोत्सव रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक चेअरमन अशोक पाटील राहणार आहेत.
शिवप्रतिमा पूजन माजी आमदार मनोहर किणेकर, २०० मीटर धावणे उद्घाटन युवा नेते महाराष्ट्र एकीकरण समिती आर.एम.चौगुले, ४०० मीटर धावणे उद्घाटन माजी महापौर शिवाजी सुंठकर, मिनी मॅरेथॉन ३ कि. मी. चे उद्घाटन देवस्की पंच कमिटी सुळगा अध्यक्ष भावकू पाटील, लक्ष्मी प्रतिमा पूजन गंगाराम पाटील, सरस्वती प्रतिमा पूजन बेनकनहळ्ळीचे कल्लाप्पा पाटील, प्रमुख वक्ते म्हणून म. ए. समितीचे नेते मनोज पावशे हे उपस्थित राहणार आहेत.
खुला गट पुरुषांसाठी बैठका मारणे उद्घाटन बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघाचे व्हा. चेअरमन बी. एन. बेनके, रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन रंजना कोलकार व शट्टूप्पा देसुरकर, खुलागट पुरुष दंड मारणे अशोक पाटील यांच्या हस्ते या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
- स्पर्धा पुढीलप्रमाणे -
२०० मीटर धावणे पुरुषांकरिता बक्षीस २१०० रुपये, १५०० रुपये, ११०० रुपये, धावणे पुरुषांकरिता ४०० मीटर बक्षिसे २५०० रुपये, १८०० रुपये, ११०० रुपये.
मिनी मॅरेथॉन तीन कि. मी. पुरुषांकरिता प्रथम बक्षीस २८०० रुपये, द्वितीय बक्षीस २१०० रुपये, तृतीय बक्षीस १५०० रुपये.
खुला गट पुरुष बैठका मारणे प्रथम बक्षीस १०५१ रुपये, द्वितीय बक्षीस ७५१ रुपये, तृतीय बक्षीस ५५१ रुपये
खुला गट पुरुष दंड मारणे प्रथम बक्षीस १०५१, द्वितीय बक्षीस ७५१ रुपये, तृतीय बक्षीस ५५१ रुपये.
ठिपक्यांची रांगोळी फक्त महिलांकरिता - प्रथम बक्षीस ३१०० रु. द्वितीय बक्षीस २७०० रु. तृतीय बक्षीस २५०० रु. आणि चौथे बक्षीस २१०० रु., उत्तेजनार्थ ५०१ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे.
तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाचे मॅनेजर एन. वाय. चौगुले यांनी कळविले आहे. ज्या स्पर्धकांना स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी मॅनेजरशी संपर्क साधावा असे कळविण्यात येत आहे.
0 Comments