बेळगाव / प्रतिनिधी 

तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य केबिनमध्ये सहाय्यक अधिकाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. मंगळवारी सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर बेळगाव तहसीलदार कार्यालयासह परिसरात एकच खळबळ माजली आहे. रुद्रेश उर्फ (रुद्रण्णा) यडवन्नावर (वय ३६) असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

त्याने तहसीलदार यांच्या केबिनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, यडवन्नावर हे तहसील कार्यालयातच कार्यरत होते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात झाली आहे.