बेळगाव : महापालिकेच्या नूतन आयुक्त बी. शुभा या आपल्या कामकाजात तत्पर म्हणजेच ॲक्टिव्ह असल्याचे मानले जात आहे. सोमवारी त्यांनी चक्क ऍक्टिव्हावरून बेळगाव शहराचा दौरा केला आणि आपण कामकाजात देखील ॲक्टिव्ह आहोत हे सिद्ध करून दाखवल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. विशेषत: बेळगावला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प त्यांनी केल्यामुळे कचऱ्याने भरलेल्या वाहनाच्या मागे राहून त्यांनी लक्ष ठेवले. त्यांच्या या ॲक्टिव्हा संचाराने लोकांचे लक्ष वेधून घेतले. बेळगावला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी त्यांनी ॲक्टिव्हा दुचाकीवरून स्वच्छता तपासण्यासाठी पाहणी केली. तसेच संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
0 Comments