बैलहोंगल / वार्ताहर
बैलहोंगल शहराच्या आश्रय वसाहतीतील शाळेच्या मैदानात पूर्ववैमनस्यातून तीक्ष्ण हत्यारांनी भोसकून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. बैलहोंगल पोलिस स्थानकाच्या हद्दीत रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. रवी तीम्मन्नावर (वय २३ रा.आश्रय कॉलनी, बैलहोंगल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री उशिरा १३ हून अधिक हल्लेखोरांनी त्याचावर हल्ला केला. यामध्ये विळा आणि बिअरच्या बाटलीने त्याला मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार कुचकामी ठरल्याने रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेच्या ठिकाणी बैलहोंगल पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.
0 Comments