- डॉ. नंदिनी बाभूळकर, राजेश पाटील, मानसिंग खोराटे, शिवाजी पाटील, विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांच्यात पंचरंगी लढत
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी चंदगड विधानसभा मतदार संघातून इच्छुकांपैकी ८ उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेतलेल्यांमध्ये काँग्रेसकडून इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, भाजपचे संग्राम कुपेकर, सुश्मिता राजेश पाटील, मनीषा खोराटे, शेकापचे नारायण वाईंगडे, केदारी पाटील, अण्णासाहेब पाटील, प्रकाश कागले यांचा समावेश आहे.
अर्ज माघारीनंतर चंदगड मतदार संघातील विधानसभा निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. छाननीत २५ जणांचे अर्ज वैद्य ठरले होते. त्यातील १७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. यामध्ये मुख्यतः महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या डॉ. नंदिनी बाभूळकर, महायुतीकडून राष्ट्रवादीचे राजेश पाटील, जनसुराज्य पक्षाकडून मानसिंग खोराटे अपक्ष म्हणून शिवाजी पाटील, विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे.
0 Comments