•  दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना 

चिक्कोडी / वार्ताहर 

चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात संगीत शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दर्शन शहा असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते चिक्कोडी शहरातील केएलई संस्थेच्या सीबीएसई शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, दुचाकी चालवत असताना दर्शन यांचे नियंत्रण सुटून दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे ते खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने चिक्कोडी शहरातील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक पीएसआय रूपा गुडदगी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.