नवरात्री २०२४ : भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व आहे, त्यामुळेच रंगांचा उत्सवही आपल्याकडे साजरा केला जातो, नवरात्रीचे नऊ रंग हे याच एकात्मकतेचे प्रतीक आहेत.
हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग नवरात्र कोणत्या दिवसापासून सुरू होते यावर आधारित असतो. दरम्यान यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे.
- गुरूवार ३ ऑक्टोबर २०२४ : पहिली माळ
- आजचा रंग : पिवळा
रंगाचे महत्त्व : प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो उदा. फुल, हळद, देवाची वस्त्र, पूजेच्या वेळी पिवळे पितांबर नेसतात, मुलीच्या लग्नात पहिली साडी ही पिवळीच नेसवतात आणि सूर्यकिरणांशी संबधीत असा हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करणारा पिवळा रंग आहे. म्हणजेच पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांतेतेसाठी पिवळा रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते. आपल्यामध्ये विश्वास आणि मैत्रीची भावना वाढवण्याचे काम पिवळा रंग करत असतो.
0 Comments