खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या लोंढा वनक्षेत्रातील मोहिमेत खवले मांजराची तस्करी करून चीनला निर्यात करण्यात येत असताना दोघांना लोंढा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. खवले मांजराची निर्यात सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळॆ लोंढा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून सतर्क राहून पाळत ठेवली होती.
खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली लोंढा विभागाचे आरएफओ, यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात एकूण चौघेजण होते. मात्र त्यातील दोघेजण जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. तर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच खवले मांजर ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या दोघा संशयतांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय तस्करीच्या तस्करांचा हात असल्याचा संशय सुनीता निंबर्गी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आरोपींना खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपींची हिंडलगा करागृहात रवानगी करण्यात आली असून, खवले मांजर या प्राण्याला संग्रहालयात सोडण्यात येणार असल्याचे, सांगण्यात आले आहे.
0 Comments