बेळगाव : यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज दि. ३ ऑक्टोबर घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवात बेळगाव शहर परिसरातील विविध मंडळे दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करतात.या पार्श्वभूमीवर कपिलेश्वर रोड रामा मेस्त्री अड्डा येथील मंडळाने शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्तीचा आगमन सोहळा आयोजित केला होता.
या सोहळ्यात एकदंत ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधले. सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
0 Comments