बेळगाव / प्रतिनिधी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्र उत्सवात होणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशीची सुरुवात नेहरूनगर येथील बसवाना मंदिरात आरतीने झाली. त्यानंतर ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला चालना देण्यात आली. त्यानंतर ही दौड सदाशिवनगर, हरिद्र गणेश मंदिर रोड, आंबेडकर नगर, गणेश मंदिर मार्गांवरील गल्ल्यांमध्ये फिरून रामदेव हॉटेल, दुर्गामाता रोड, रामनगर,अशोकनगर, सुभाषनगर अशा मार्गांवरून शेवटी शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर येथे सांगता करण्यात आली.
यावेळी जोतिबाची आरती करून हजारो धारकऱ्यांनी ध्येय मंत्र म्हटला आणि ध्वज उतरविण्यात आला. यावेळी सदाशिवनगर येथील प्रमिला पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना, दुर्गामाता दौड ही नवरात्रीमध्ये खूप खास असते. अनेक वर्षांपासून साजरी होत असलेली दौड आपल्या सांस्कृतिक वारशात जपली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या दौडीत अनेक ठिकाणी उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
0 Comments