नवरात्री २०२४ : नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. देवीची नऊ रूपे नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे. यामुळेच नवरात्रीत ९ दिवस भाविक वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात.
बुधवार दि. ९ ऑक्टोबर २०२४ : सातवी माळ
आजचा रंग : निळा
रंगाचे महत्त्व :
तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. विश्वासाचं, श्रद्धेचं, सुस्वभावाचं, आत्मियतेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते. निळा रंग हा शांततेचं प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता दर्शवतो. निळ्या रंगाचा मेंदूवर चांगला प्रभाव पडतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढवण्याचेही काम करतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते.
0 Comments