बेळगाव / प्रतिनिधी
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बेळगावात घडली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी बुधवारी केला.
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी गावातील आरती चव्हाण (३२) ही गर्भवती होती. आरतीला मंगळवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने गोंधळी गल्ली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंचवीस हजार रुपये भरल्यानंतर सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर आले तेव्हा बीपी कमी होता.
रुग्ण वाचणार नाही, असा विचार करून त्यांनी केएलई रुग्णालयात धाव घेतली. केएलई रुग्णालयात नेत असताना वाटेतच आरतीचा मृत्यू झाला. रूग्ण तीन तास रूग्णालयात त्रस्त होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरतीच्या कुटुंबीयांनी रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला.
रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात कुटुंबियांनी खडेबाजार पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments