बेंगळूर  : कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बेळगाव येथे होणार असल्याची माहिती कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.

हिवाळी अधिवेशनाच्या तारखेच्या अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळाचे अधिवेशन ९ ते २० डिसेंबर असे ११ दिवस चालविण्याबाबतही विधिमंडळाने चर्चा केली असून तारखेचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.