धनत्रयोदशी : वर्षभरातील महत्त्वाच्या सणांपैकी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण म्हणून दिवाळी हा सण जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होऊन नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण एकामागे एक येतात. त्यामध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व राज्यभरात दिले जाते. या दिवशी सोने खरेदी केले जाते. धनलक्ष्मीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनतेरस आणि धनत्रयोदशी या दिवशी व्यापारी, सराफ आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या सणाला महत्त्व देतात.
आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी आणि इतर कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत शस्त्रांची अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांची म्हणजेच चोपडी असे बोलल्या जाणाऱ्या वहीची या दिवशी पूजा केली जाते.
व्यापारी आणि शेतकरी वर्गात धनत्रयोदशीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मिठाई आणि गोडधोड पदार्थ तयार करून त्याचे वाटप करून आनंदाने दिवळी साजरी केली जाते. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवताची आणि धन-धान्यांची पूजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले धान्यच हे संपत्ती तसेच लक्ष्मी प्रमाणे असल्याने शेतकरी वर्ग त्या धान्यांची पूजा करून धने, गुळ, खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसांपासून सर्वत्र पणत्या आणि विद्यूत रोषनाईने घराबाहेरचा परिसर उजळवण्यात येतो.
- अशी करा धनत्रयोदशीची पूजा -
- धन्वंतरी आणि गणपती-लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाट घ्या. त्यावर स्वस्तिक काढून त्यावर दिवा लावा.
- दिव्याला हळद - कुंकू आणि तांदुळ लावून त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करा.
- गणपती आणि लक्ष्मीची पूजा करून नमस्कार करावा.
0 Comments