बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा येथे पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला ओव्हरटेक करताना तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकर  चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. मंगळवारी सकाळी ६.३० वा सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  अपघात झाला त्यावेळी टँकर हुबळीहून बेळगावच्या दिशेने येत होता. 

ट्रक आणि ऑईल टँकर मध्ये झालेल्या या अपघातानंतर महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद झाली होती. वाहतूक सुरळीत होईपर्यंत सर्व्हिस रोडकडे एकेरी वाहतूक वळवण्यात आली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी  घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर उलटलेला टँकर बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.