खानापूर : विश्वभारती कला क्रीडा संघटना बेळगाव, उपशाखा खानापूरचे संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई माजी सैनिक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी ११. ३० वा. राजाभाऊ मादर यांच्या जांबोटी येथील कार्यालयात सरकारी शाळा टिकविण्याच्या अभियानाबाबत विचारविनिम करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

एसडीएमसी कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष , सदस्य,  शिक्षणप्रेमी, क्रीडाप्रेमी सर्व माता - भगिनी, बंधू थोरमंडळी या सर्वांनी या बैठकीसाठी एकत्रित जमावे व दि. २७ रोजी  शिवस्मारक खानापूर या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहून सर्वांनी मार्गदर्शन करावे असे आवाहन अनिल शांताराम कालमनकर यांनी केले आहे.