खानापूर / प्रतिनिधी
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सर्व योजना पुरेशा प्रमाणात राबविल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामपंचायतीला दिला जाणारा राज्यस्तरीय गांधी ग्राम पुरस्कार, खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्रामपंचायतीला मिळाला असून, सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार त्यांनी पटकावला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात व सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
सन २०२२-२०२३ मध्ये देखील संपूर्ण खानापूर तालुक्यातून बेकवाड ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाला होता. यावर्षी देखील २०२२-२०२३ मध्ये हा पुन्हा पुरस्कार मिळाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील एकूण १५ गावे या आदर्श पुरस्कारासाठी निवडण्यात आली आहेत. व एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून प्रकाशझोतात आली आहे.
ग्रामीण विकासात भरीव कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी, बेकवाड ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतीमधून बेकवाड ग्रामपंचायत आदर्श ठरली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ४ गावे आणि ४ वाड्या व १२ सदस्य आहेत. याठिकाणी १ पेक्षा जास्त १००० कुटुंबे आहेत. आणि २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५३२० होती. आणि आता ती ६५०० पेक्षा जास्त आहे. ८५ टक्क्यापेक्षा जास्त साक्षरता दरासह, शेती आणि दुग्धव्यवसाय हे येथील बहुतेक लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत.
0 Comments