बेळगाव / प्रतिनिधी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्र उत्सवात होणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीच्या सहाव्या दिवशीची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग येथील दुर्गा देवी मंदिरात दुर्गा मातेच्या आरतीने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्येष्ठ धारकरी शंकर दादा भातकांडे यांच्याहस्ते ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही दौड भारतनगर, खासबाग, वडगाव मधील अनेक गल्ल्यामधून फिरून जुने बेळगाव, नाझर कॅम्प, आनंदनगर, संभाजीनगर अशा मार्गावरून शेवटी मंगाई मंदिर येथे सांगता करण्यात आली.
यावेळी श्री मंगाई देवीची आरती करून हजारो धारकऱ्यांनी ध्येय मंत्र म्हटला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. दीपक करंजीकर यांनी दौडीत सहभागी झालेल्या धारकऱ्यांना छत्रपती शिवरायांच्या बद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उद्योगपती रोहित देशपांडे व डॉ. दीपक करंजीकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. आजच्या दौडीत अनेक ठिकाणी उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
0 Comments