• उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर, उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पकडून ४० लाखांहून अधिक दारू जप्त केली आहे. गोव्याहून महाराष्ट्रात अवैधरित्या फिल्मीस्टाईलने वाहतूक करण्यात येत असलेल्या कंटेनरला पकडून तब्बल ४० लाखांहून अधिक किमतीची दारू उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

याबाबत माहिती मिळताच उत्पादन शुल्क आयुक्त मंजुनाथ यांनी मध्यरात्री गोव्याहून महाराष्ट्रात जाणाऱ्या कंटेनर लॉरीच्या वाहनाची तपासणी केली, यावेळी कंटेनर चालकाने पळ काढला असून संशयित वाहनाची तपासणी केली असता, त्यात बनावट दारूच्या 3060 बाटल्या असल्याचे आढळून आले. वाहनातील 255 बॉक्समध्ये असलेल्या दारूची किंमत 42 लाखांहून अधि असून दारूसोबतच इतर मौल्यवान साहित्याचे ४० लाख असे एकूण ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या वाहनाला महाराष्ट्र पोलीस स्टेशनचे जीएसटी बिलही दाखवण्यात आले होते, प्लास्टिक बदल्या वाहतुकीसाठी नेत असल्याचे भासवून यामाध्यमातून दारूची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे.