•  चिक्कोडी तालुक्याच्या मंगनूर गावातील घटना   

चिक्कोडी / वार्ताहर 

कौटुंबिक कलहातून एका महिलेने तिच्या १७ महिन्याच्या बालकासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चिक्कोडी तालुक्यातील मंगनूर गावात मंगळवारी ही घटना घडली. गायत्री वाघमोरे (वय २६) आणि १७ महिन्यांचा बालक कुशल वाघमोरे अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. 

क्षुल्लक कारणावरून घरात भांडण झाले आणि महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेची चिक्कोडी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट  होणार आहे.