खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नागरगाळी वन परिक्षेत्रात असलेल्या हलगा येथे ओल्या चंदनाच्या लाकडांची तस्करी करताना एकाला मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी, अटक करण्यात आली. मंजुनाथ बसप्पा मुरगोड, गरबेनहट्टी (ता. खानापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, नागरगाळी वनक्षेत्रात हलगा येथे संशयित मंजुनाथ चंदनाची तस्करी करताना सापडला. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून दीड किलो चंदन, करघस, कुऱ्हाड व दुचाकी जप्त असा ऐवज जप्त केला आहे. सदर कारवाई नागरगाळीचे आरएफओ प्रशांत जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
याप्रकरणी भारतीय वन अधिनियम कलम व कर्नाटक पोलिस अधिनियम कलम लाकूड तस्करी प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
0 Comments