बेळगाव : कर्नाटक सरकारच्या बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलच्या तिघा ज्युडो खेळाडूंनी केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय पातळीवरील ज्युडो स्पर्धेमध्ये एक रौप्य व दोन कांस्य पदक पटकावत अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
केरळ राज्यातील त्रिशूर येथे गेल्या 23 ते 27 सप्टेंबर या कालावधीत अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय पातळीवरील ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगाव स्पोर्टस हॉस्टेलच्या अलिया मुल्तानी (48 किलो खालील गट) हिने रौप्य पदक मिळविले. अलिया खेरीज संजना शेट (63 किलो खालील गट) व राधिका डुकरे (70 किलो खालील गट) यांनी आपापल्या गटात कांस्य पदकाची कमाई केली. या तिघा ज्युडो खेळाडूंना युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास यांचे प्रोत्साहन, तसेच ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुल्तानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
0 Comments