बेळगाव : सुळगा (हिं.) वेंगुर्ला रोड, येथील रहिवासी सौ. मल्लवा लक्ष्मण कलखांबकर (वय ७५) यांचे आज बुधवार दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी ४ वा. होणार आहे. तर रक्षाविसर्जन उद्या गुरूवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. होणार आहे. सुळगा (हिं.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीचे सदस्य गणपत कलखांबकर यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments